सातारा : नकाशपुरा पेठ येथे घरफोडी करणारी सराईत महिला गुन्हेगाराला गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले आहे. उमा प्रदीप पडळकर रा. कोरेगाव असे अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव आहे.
दि. 18 रोजी नकाशपुरा पेठेतील गार्डन सिटी प्लॅट नं 4 मधून अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून कपाटात ठेवलेले 60 हजाराची रक्कम चोरून नेल्याची फिर्याद सौ. अस्मिता खडसे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली होती. शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला संबधित ठिकाणी माहिती घेण्यास पाठविले. पथक संबंधित ठिकाणी गेल्यानंतर त्याठिकाणी संशयीतरित्या उमा पडळकर ही संशयीतरित्या फिरताना आढळून आली. पथकाने तिला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पडळकर हिने सदर घरफोडी केल्याचे कबुल केले. पडळकर हिला न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.सदर कारवाईत पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील स.पो.नि. अविनाश पोवार, पो.हवा. संतोष इष्टे, पो.ना. प्रविण फडतरे, पो.कॉ. सोमनाथ शिंदे, म.पो.कॉ. सुवर्णा बोराटे यांनी सहभाग घेतला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी. जाधव करीत आहेत.