सातारा : सार्वत्रिक निवडणुका म्हटलं की, अनेकांना रोजगार मिळतो, प्रचारानिमित पक्ष व प्रचार कार्यालयात गर्दी होते,आता मतदारांसाठी त्याच धर्तीवर कोविड मदत केंद्र लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यानी सुरू करावी अशी पहिली मागणी सातारा जिल्हयातून होऊ लागली आहे. याला किती प्रतिसाद मिळतो? यावर कार्यकर्त्यांचे खरे मूल्यांकन केले जाणार आहे. याबाबत माहिती अशी की,कोविड चे संकट जगभर पुन्हा आले आहे. सातारा जिल्ह्यात कोविड बाधित रुग्णांची संख्या दुसऱ्या टप्प्यात दिड हजाराचा टप्पा पार केला आहे. कोणाला बेड मिळत नाही, कोणाला ऑक्सिजन मिळेना, सामान्य कुटुंबातील सदस्य असलेल्या कोविड बाधितांची अवस्था म्हणजे सरकारी पातळीवर ना दाद, खाजगी दवाखान्यात उपचारासाठी ना खिश्यात दाम अशी अवस्था पाहण्यास मिळत आहे. अजूनही लोकांना लस मिळत नाही. सरकारी दवाखान्यात लस उपलब्ध नाही, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने नातेवाईकांना बाहेरूनच कोविड बाधितांची चौकशी करावी लागत आहे. ही बाब उघड असली तरी त्याचा गाजावाजा होत नाही. आंदोलनाला बंदी, निवेदन स्वीकारणाऱ्याला बंदी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यास बंदी, आवाज कोणीही उठवित नसल्याने सातारा जिल्ह्यात एक प्रकारे अघोषित आणीबाणी लादली गेली आहे. घाऊक व्यापाऱ्यांची दुकाने उघडी व ग्रामीण भागातील किरकोळ व्यापारी व लहान दुकानदारांची दुकाने बंद हे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे. गरिबांचा रोजगार बुडाला आहे, ग्रामीण भागातील दररोज कष्ट करून उपजीविका करणाऱ्या लोकांचे हाल सुरू झाले आहेत. पूर्वी पहिल्या लॉक डाउन ला मानवता भावनेतून सर्वांनीच मदत केली होती. आता दुसऱ्या लॉक डाउन मध्ये अनेकांनी हात आखडता घेतला आहे.ही वस्तुस्थिती आहे काही लोकप्रतिनिधी ते ही मान्य करीत आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रामीण रुग्णालये, मोठ्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, पण, वैधकीय अधिकारी मिळत नाहीत. लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित लोकांच्या घरी वैधकीय शिक्षण पूर्ण केलेले किमान पाचशे डॉक्टर व स्पेशालिस्ट आहेत. त्यांनी मानवता भावनेतून सरकारी दवाखान्यात सेवा दिली तर खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली जाण्याचा वारसा पुढे चालविला जातो, हे सिद्ध होणार आहे, पण, असे दिसून येत नाही. राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी यांच्या साठी दिवसरात्र काम करणाऱ्या एका ही कार्यकर्त्यानी कोविड मदत केंद्रा साठी मागणी केली नाही. त्यामुळे त्यांच्या समाज्याबद्दल असलेली निष्ठा ही निवडणुकी पुरती असल्याची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे. आचारसंहिता पाळली जात असताना सातारा जिल्ह्यात गावोगावी निवडणुकीत दारूचा महापूर व मटणाचा ढीग पोहच केला जातो. त्याची तक्रार होऊनही कारवाई होत नाही. हा भाग वेगळा असला तरी आता कोविड संसर्ग टाळण्यासाठी लस व रुग्णासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी कोविड मदत केंद्र उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनीच गट तट व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कोविड मदत केंद्र गावोगावी सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी होऊ लागली आहे. यासाठी आवश्यक लागणारी जागा सुध्दा उपलब्ध करण्यास गावकरी तयार झाले आहेत. तरी लवकरात लवकर किमान तालुक्याच्या ठिकाणी असे कोविड मदत केंद्र उभारले जावे अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून महारुद्र तिकुंडे, प्रवीण मोरे, दाऊद मुल्ला, सुनिल उबाळे व चळवळीतील कार्यकर्त्यानी केली आहे.
सातारा जिल्ह्यात प्रचार कार्यालयासारखे कोविड मदत केंद्र सुरू करण्याची मागणी
RELATED ARTICLES