मेढा: युवकांनी एकत्रित येवून एँजल ऍग्रो फुड्स अॅन्ड बेव्हरेजेस प्रकल्प उभारला हि कौतुकास्पद बाब आहे यातूनच संधी निर्माण करा आणि उद्योजक बना असा सल्ला आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी युवकांना दिला.
मौजे जवळवाडी येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते एँजल एँजल ऍग्रो फुड्स अॅन्ड बेव्हरेजेस कंपनीच्या माध्यमातून मिनरल ड्रिंकिंग वॉटर प्रकल्प उद्घाटन सोहळा पार पडला या वेळी ते बोलत होते
पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की या प्रकल्पामुळे युवकांना रोजगार संधी प्राप्त होवून वेळीच चालना मिळणार आहे या माध्यमाचा चांगला उपयोग केला तर युवकांनाही छोटे उद्योग उभारणीस संधी मिळेल. गावाकडे शेती शिवाय पर्याय नसल्याने युवकांना मुंबईला कामासाठी जावे लागते आता मात्र युवकांनी शेती आणि व्यवसाय गावाकडेच करुन आपली प्रगती करावी असेही सुचित केले.
या उदघाटन सोहळ्यास जावली पंचायत समितीच्या सभापती अरूणा ताई शिर्केमेढा नगरपंचायतचे उपाध्यक्ष पांडूरंग जवळ माजी पं .स सभापती कांतीभाई देशमुख , पं स सदस्य विजय सुतार ग्रामपंचायत जवळवाडी सदस्या गीताताई लोखंडे विविध गावचे मान्यवर नागरीक तसेच ग्रामस्थ मंडळ जवळवाडी आणि मित्र परीवार, नातेवाईक उपस्थित होते. या वेळी विशाल जवळ सुधिर शिंदे अमर पाटील यांनी या प्रकल्पाची सुरूवात केली या बाबत आ . शिवेंद्रसिंह राजे भोसले, सभापती अरुणा ताई शिर्के मेढा उपनगराध्यक्ष पांडूरंग जवळ तसेच विविध गावचे मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश जवळ ( सर ) यांनी केले. प्रास्ताविक अमर पाटील यांनी केले. आभार सदाशिवराव जवळ यांनी मानले.