मुंबई: पैलवान योगेश्वर दत्तला लंडन 2012 ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या कांस्य पदकाऐवजी सुवर्णपदक मिळू शकतं. कारण लंडन ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता तोगरुल असगारोव्ह हा सुध्दा उत्तेजक सेवन चाचणीत दोषी असल्याची माहिती आहे. आता लवकरच योगेश्वर दत्तचीही डोपिंग टेस्ट होणार आहे. त्यामुळे या चाचणीनंतरच याबाबत चित्र स्पष्ट होईल. याआधी लंडन ऑलिम्पिकमधील रौप्य पदकासाठी योगेश्वरच्या नावाची चर्चा सुरु होती. रौप्य पदक विजेता रशियन खेळाडू बेसिक खुदोखोज हाही डोपिंगमध्ये दोषी आढळला आहे.