हिवाळी अधिवेशनात धडक मोर्चाचे आयोजन
सातारा : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा सातारा यांच्यावतीने ग्रामसेवकांनी आपल्या प्रलंबित मागण्याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज सातारा पंचायत समितीसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले आहे. तसेच हिवाळी अधिवेशावर धडक मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुद्गल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी ग्रामसेवकांच्या तीन वर्षे सेवा काल तात्काळ नियमित करणे, सोलापूर जिल्ह्यातील 239 लोकांची चुकीची कार्यवाही रद्द करावी, ग्रामसेवकांना दरमहा पगाराबरोबर 3 हजार रुपये प्रवास भत्ता मंजूर करणे, नरेगा करीता स्वतंत्र यंत्रणा निर्मिती करावी, सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारीत ग्रामविकास अधिकारी पदे व सजे निर्मिती करावी, ग्रामसेवक संवर्ग वैद्यकीय कॅशलेस सुविधा मिळावी, राज्यभर आदर्श ग्रामसेवक सोहळा मंजूर करावा, दि. 12 जून 2013 चे विना चौकशी फौजदारी परिपत्रक मागे घ्यावे, विस्तार अधिकारी पदाची वाढ करावी. सन 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ग्रामसेवक संवर्ग सुधारीत जॉब चार्ट देण्यात यावा, निलंबित ग्रामसेवकांना प्राधान्य क्रमाणे कामावर घेण्यात यावे, राज्यभर ग्रामसेवकांवर होणारे हल्ले, मारहाण, खोट्या केसेस याबाबत सेवा संरक्षण व सरकारी कर्मचारी मारहाण गुन्हा अजामीनपात्र करावा, यादी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनात हनुमंत मुरुडकर, नंदकिशोर वानखेडे, एस. डी. कदम, साहेबलाल तांबोळी, उध्दव फडतरे, अनिल कोहळे, रश्मीताई शिंदे, बापूसाहेब अहिरे, संजय पाटील, शरद भुजबळ, महिपती बेनके, उदयराव शेळके, नारायण पवार, युवराज साळुंखे, सचिन गायकवाड, सौ. सुचित्रा मस्के, दिलीप माळवे, प्रशांत फडतरे, सौ. प्रज्ञा माने, व ग्रामसेवक सहभागी झाले होते.
22 हजार ग्रामसेवक राज्यातून कामबंद आंदोलनात आजपासून सहभागी
11 नोव्हेंबर रोजी जि. प. धरणे आंदोलन
15 रोजी आयुक्त कार्यालयासमोर धरणे,
17 रोजी ग्रामपंचायत यांच्या बीडीओकडे देवून प्रत्यक्ष कामबंद आंदोलन