सातारा : सातारा येथे मराठा क्रांती मूक मोर्चा सोमवार दि. 3 ऑक्टोबर दुपारी 12 वाजता आयोजित केला आहे. या मराठा क्रांती मुक मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण सातारा शहरासह जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण झाले आहे. एक मराठा लाख मराठा याबरोबरच भगवे झेंडे, टोप्या टि शर्ट यांची रेलचेल सातार्यात यापूर्वीच झाली होती ते खरेदी करण्यासाठी मराठा बांधवांनी ठिकठिकाणी दुकानात गर्दी केली होती.
ना नफा ना तोटा या तत्वावर साहित्याची विक्री केली जात होती. या मोर्चाच्या निमित्ताने सातारा शहरात अंदाजे वीस ते पंचवीस लाख नागरिक सहभागी होणार असे ग्रहीत धरुन सातारा शहरातील व उपनगरात तसेच महामार्गालागत अनेक ठिकाणी दुचाकी चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अडीच ते तीन हजार महिला व पूरुष स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा प्रशासनाच्यावतीने सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यातील पोलीस व अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात ठेवलेले आहेत. या मोर्चाच्या जागृतीसाठी आज सातारा शहरात युवकांनी जय शिवाजी, जय भवानी अशी घोषणा देत दुचाकी रॅली काढली. ठिकठिकाणी पार्किंग, पोलीस मदत केंद्र पायी मार्ग याची माहिती दर्शवनारे फलक लावण्याचे का चालू होते. याशिवाय पोवई नाका या मुख्य ठिकाणी मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी मार्गदर्शन करणार्या युवतींचे भाषणे स्पीकरवरुन सातारा शहरात ऐकू जावे यासाठी संपूर्ण शहरात स्पीकर लावण्यात आले आहेत. स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चाचे चित्रीकरण दहा ड्रोन कॅेर्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
