भिलार : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपले दान कोणाचेतरी आयुष्य पुन्हा उभे करणार आहे. रोटरी सारख्या सेवाभावी संस्थेने आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीराचा कार्यक्रम इतरांना प्रेरणादाई असाच आहे. अशा सामाजीक उपक्रमांसाठी पालीका रोटरीला सर्वतोपरी सहकार्य करेल असा विश्वास पाचगणी नगरपालीकेच्या मुख्याधीकारी अमीता दगडे -पाटील यांनी केले.
पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब आणि सातारा येथील बालाजी ब्लड बँकेच्या सयुक्त विद्यमाने आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी सौ.दगडे -पाटील बोलत होत्या. यावेळी नगरपालीकेच्या नगराध्यक्षा सौ.लक्ष्मी कर्हाडकर, पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायणराव पवार, विजवितरणचे उपअभियंता श्री.स्वामी, रोटरीचे अध्यक्ष नितीन भिलारे, अॅड.सुनिल कांबळे, माजी अध्यक्ष जयवंतराव भिलारे, सचिव सुनिल धनावडे, रोटरॅक्टचे अध्यक्ष प्रतीक देसाई, सचिव नफीसा हेमानी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ.लक्ष्मी कर्हाडकर म्हणाल्या रोटरी सारख्या सामाजीक संस्थेने रक्दानाचा आयोजीत केलेला उपक्रम कौतुकास्पद असुन सामाजीकतेशी जोडलेल्या सर्व कार्यक्रमांना आमचे कायमच सहकार्य राहील. नितीन भिलारे म्हणाले आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने प्रेरीत होऊन सामाजीक क्षेत्रात काम करताना आम्ही रक्तदानाचा सकंल्प केला आहे. रोटरी अशा सामाजीक चळवळीत नेहमी सक्रीय असते या पुढेही अशा प्रकारचे उपक्रम राबवुन समाजातील उपेक्षीत घटंकाना आम्ही सहकार्य करण्याचा प्रामाणीक प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. या कार्यक्रमास न्यु ईरा टिचर ट्रेनींग स्कूल, धनावडे क्लासचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी महेंद्र पांगारे, राजन गाडेकर, राजेंद्र भगत, डॉ.जयवंतराव चौधरी, विजय गांधी, विवेक बोधे, सुरेश बिरामणे, संजय अंाब्राळे, अशोक पाटील रोटरॅक्टचे, प्रमोद कासुर्डे, प्रशांत कासुर्डे, सांगर डांगीस्ते, शब्दाली बागडे व सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लबच्या सदस्याबरोबरच न्यु ईरा टिचर ट्रेनींग स्कूल, धनावडे क्लासचे तसेच शहर व ग्रामीण परीसरातील 112 युवकांनी रक्तदान केले. नितीन भिलारे यांनी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. सुत्रसंचालन राजन गाडेकर यांनी केले तर प्रतीक देसाई यांनी आभार मानले.