सातारा : माण खटावसाठी संजीवनी असणार्या जिहे कठापूर योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी सरकारने 1 हजार 85 कोटी 53 लाखांचा निधी मंजूर केला आहे. तर वांग मराठवाडी योजनेसाठी 253 कोटी मंजूर झाले असून दोन्ही योजनांची कामे लवकरच पूर्णत्वास जातील. जिहे कठापूर योजनेचे बरेच काम उरकत आल्याने डिसेंबर 2018 पर्यंत एका तरी लाईनने नेर तलावात पाणी सोडणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
ना. शिवतारे म्हणाले, युती शासनाच्या काळात माण-खटावला संजीवनी देणार्या जिहे कटापूर योजनेला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर मंजूर झालेला निधी खर्च झाल्यानंतर गेली 15 वर्षे ही योजना रखडली. त्यानंतर पुन्हा युती सरकार आल्यानंतर योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर सत्ताधारी असणार्यांनी ही मंजूरी आमच्यामुळेच मिळाली असल्याचा दावा करून जनतेची दिशाभूल करण्यास सुरूवात झाली आहे. वाळूची कमतरता आणि पाऊस यामुळे ही योजना रखडली होती. मात्र, महसूल विभागाने ठिकठिकाणी छापे टाकून जप्त करण्यात आलेली वाळू योजनेसाठी देण्याचे आदेश दिले आहे.
त्यासाठी जलसंपदा विभागाने रॉयल्टीही भरली आहे. त्यामुळे कामास गती येणार आहे. बॅरेजचे काम पूर्ण झाले असून पंपहाऊस तयार झाले आहे. येथे विद्युतीकरणााचे काम राहिले आहे. याचे साहित्य या ठिकाणी आले असून लवकरच तिन्ही पंप कार्यान्वित करण्यात येतील. कामाचा प्रत्येक टप्पा ठरवण्यात आला असून त्यांना वेळ देण्यात आला आहे. त्यानुसार काम होत असल्याने डिसेंबर 2018 मध्ये एका तरी लाईनने नेर तलावात पाणी सोडणार आहे. त्यानंतर 67 गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
याचबरोबर पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी सिंचन योजनेला 253 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
तर येथील पुनर्वसितांचा प्रश्न निकाली निघाला असल्याचे ना. शिवतारे यांनी सांगितले. यावेळी कास परिसरात असणार्या अनधिकृत कनेक्शनवर काय कारवाई करणार? असे विचारल्यावर ज्या ग्रामपंचायतींना कनेक्शन देण्यात आले आहे. त्यांच्याकडून सर्व माहिती मागवू घे ऊन बैठक घेण्याच्या सूचना ना. शिवतारे यांनी मुख्याधिकार्यांना दिल्या.
डिसेंबर 2018 पर्यंत नेर तलावात पाणी : पालकमंत्री
RELATED ARTICLES