कोडोली : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडोली येथे बीट स्तरावरील बाल क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले होते सदर स्पर्धेत वडगाव हवेली , रेठरे बुः गोळेश्वर केंद्रातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या त्यामध्ये खो खो ,कबड्डी ,लांब उडी,लंगडी,रस्सीखेच व धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या विजेत्या खेळाडुंची तालुका स्तरावर निवड झाली सदर स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी गटशिक्षण अधिकारी श्री.गायकवाडसो , य.मो.कृष्णा कारखान्याचे माजी संचालक श्री .बाळासाहेब जगताप ,विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन उत्तमराव पाटील उपसरपंच घनश्याम जगताप , शरद जगताप शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष संदिप होनकळसे मारुती जगताप मिलींद जगताप , केंद्र प्रमुख श्री पाटील सर , पवार सर ,मुख्याध्यापक पाटील सर ,सौ.अश्विनी देव मॅडम यांचे विशेष सहकार्य मिळाले विध्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते .