औषधी वृक्ष लागवडीचा उपक्रम स्तुत्य : अश्‍विन मुद्गल

सातारा : येथील श्री खिंडीतील गणपती कुरणेश्‍वर देवस्थानच्या र्औषधी वृक्ष लागवड उपक्रमास जिल्हाधिकारी अर्श्ंिवन मुदगल यांनी  आज भेट देउन कायार्ंची प्रशंसा केली.
यावेळी उपक्रमाचे विश्‍वस्त  माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले यांनी त्यांना विस्तृत माहीती देत त्यांचा गणेश प्रतिमा, श्रीफळ व प्रसाद देउन सत्कार केला.
या उपक्रमात लागवड करण्यात येणार्‍या विवध औषधी वृक्षांची पहाणी तसेच नव्याने केल्या जाणार्‍या उद्यानाची पहाणी अश्‍विन मुदगल यांनी सखोलपणे करत माहीती घेतली.
यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक जितेंद्र शिंदे, डॉ.अनुराधा गोडबोले, रमण वेलणकर, डॉ. उमेश करंबेळकर,ताटके गुरुजी उपस्थित होते.