सातारा (अतुल देशपांडे) : येथील विविध दत्त मंदिरात मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी होत. आज रविवारी ही जिल्ह्यातील विविध दत्त तीर्थक्षेत्री भावीकांनी मोठया संख्येने उपस्थिती लावून हा उत्सव भक्ती भावात साजरा केला. सातारा येथील हजारो भावीकांचे श्रध्दा स्थान असणार्या प्रतापगंज पेठेतील मुतालिक दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त 2 दिवसीय धार्मीक कार्यक्रम संपन्न झाले. यात वेदमूर्ति अनील शास्त्री वाळींबे यांचेसह 11 ब्रह्मवृंदांनी मंदिरात मंत्रजागर केला. यामध्ये वेदमूर्ति अनील शास्त्री वाळींबे यांचे समावेत वे.मू. गोविंद शास्त्री जोशी यांच्या वेदांत विद्यापीठातील श्रीपाद शास्त्री जोशी. विठठल शास्त्री एकांडे, राम शास्त्री जाशी,मंगेश देशपांडे व सहकार्यांनी मात्र जोरात ऋग्वेदातील रुचा व सुक्तांचे पठण केले. यात पद, क्रममधील काही भाग सादर केला. या मंदिरात जगताप बंधू यांचे वतीने आज रविवारी विशेष फुला पानांची सजावट करण्यात आली होती. संपूर्ण मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आल्याने मंदिराला वेगळीच झळाळी आली होती. तसेच याबाबत अधिक माहिती देताना मंदिराचे वतीने श्रीमती मुतालिक म्हणाल्या की, सायंकाळी सोलापूर येथील सुप्रसिध्द किर्तनकार सौ. अपर्णा सहस्त्रबुध्दे यांचे जन्मकाळाचे किर्तन होउन पाळणा व आरती संपन्न झाली तसेच तीर्थं प्रसाद वितरण करण्यात आला.तसेच सुंठवडा वाटपानंतर लघु रुद्राचेही पठण करण्यात आले. रात्री उशीरापयर्ंंत दर्शनासाठी भावीकांनी गर्दी केली होती.
या सोबतच सातारा शहरातील गोडोली येथील श्री साईबाबा मंदिरात पहाटे विशेष अभिषेक करण्यात आला तसेच माची पेठेतील टोपे मामा दत्त मंदिरात, आनंदवाडी दत्त मंदिर, फुटका तलाव येथील स्वच्छंदी दत्त मंदिर, कुरणेश्वर येथील दत्त मंदिर ,गेंडामाळ येथील दत्त मंदिर,समर्थ मंदिर रोडवरील श्रीधर स्वामी दत्त मंदिर,सज्जनगडावरील दत्त मंदिर, श्री क्षेत्र नारायण पूर,श्री क्षेत्र मोर्वे,श्री क्षेत्र गोंदावले येथील दत्त मंदिर,सातारा रेल्वे स्टेशन दत्त मंदिर येथे मोठ्या भक्ती भावात दत्त जयंती साजरी झाली.
माहुली येथील रेल्वे स्टेशन नजीकच्या दत्त मंदिरातील वेगळी खासियत अशी की या मंदिराचे मागील बाजूस असणारे 60 वर्षाचे झाड की ज्यातून वड, पिंपळ आणि उंबर असे तीन वृक्ष प्रकटले आहेत या वृक्षाचे दर्शनासाठी आज सातारा परिसरातील दत्त भक्तांनी मोठी गर्दीं केली होती. येथे पहाट पासून अभिषेंक , काकड आरती संपन्न होउन सुमारे 10 हजाराहून अधिक भावीकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
दरम्यान सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर असणार्या श्री क्षेत्र नारायणपूर येथेही एकमुखी दत्त मंदिरात दत्तजन्म सोहळा लाखो भावीकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. नारायणपूर येथे जाण्यासाठी सातारा, खंडाळा, शिरवळ, सासवड व स्वारगेट पुणे येथून विशेष एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या.
जिल्ह्यात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी
RELATED ARTICLES