फलटण : फलटण एस.टी.आगारामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या186 व्या जयंती उत्सोव निमित्त म.फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचिञाचे अनावरन फलटण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा निता नेवसे यांचे शुभाहस्ते.फलटण आगाराच्या आगार व्यवस्थापक रामदास व्यवहारे त्यांच्या आनिता व्यवहारे, सुनंदा जाधव यांचे प्रमुख उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आजित जाधव यांनी केले, तर सुत्रसंचालन दत्तात्रय अडसुळ व योगेश भागवत यांनी 3 जानेवारी रोजी करण्यात आले. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष डॉ.विजयराव बोरावके, फलटण आगार कर्मचारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष मोहनराव रणवरे,लोकमान्य उद्योग समुहाचे डॉ.बी.के.यादव, महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दशरथ फुले, स्वाभिमानी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते बजरंग गावडे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे, डॉ.उत्तमराव शेंडे,नानासो इवरे,संपत जाधव, संजय मोरे, मनोज आढाव,मुनिश जाधव , सुखदेव अहीवळे
आगार व्यवस्थापक डुबल साहेब, वाहतुक निरीक्षक आनिल रनवरे, धिरज अहीवळे, दत्तात्रय महानवर, अमोल वडगावे , कांबळे साहेब, झेंडे साहेब,तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आ.भा.माळी महासंघाचे तालुका प्रमुख अरविंद राऊत,व रोहन शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.विजयराव बोरावके, डॉ.बी.के.यादव, संपतराव जाधव,प्रा. रमेश आढाव, मोहनराव रणवरे, दशरथ फुले, हरीष काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास फलटण एस.टी.आगारातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थीनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन आगार व्यवस्थापक रामदास व्यवहारे साहेब यांनी मानले.