(छायाः विलास काळे)
महाबळेश्वर ः महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन प्रसिध्द असलेल्या महाबळेश्वरला लोकप्रतिनिधीच्या मताच्या राजकारणामुळे व अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे महाबळेश्वरला एक नवी ओळख प्राप्त झाली आहे. महाबळेश्वर हे केवळ नावालाच नंदनवन म्हणुन राहीले असुन आता या पर्यटन स्थळाला टपरींचे नंदनवन म्हणुन ओळखले जावु लागले आहे. शहरात पहावे तिकडे टपरी दिसतात. या टपरीं पासुन शहराचा एकही रस्ता शिल्ल्क राहीला नाही. या टपरींमुळे शहराचे स्वरूप बकाल बनले आहे परंतु याची नाखंत सत्ताधारी मंडळींना ना प्रशासनाला.
राज्यातील सर्वांत उंचावरील थंड हवेचे ठिकाण म्हणुन महाबळेश्वर देशात प्रसिध्द आहे. या पर्यटन स्थळाला लाभलेला निसर्गदत्त खजिना पाहण्यासाठी येथे देशविदेशातुन सुमारे 20 लाख पर्यटक सहलीसाठी येतात. शालेय सहीलींचे प्रमाणही येथे मोठे आहे. काही वर्षांपर्यंत येथील पर्यटकांची संख्या वाढत होती. परंतु आता पर्यटकांची संख्या वाढताना दिसत नाही. उलट पर्यटकांची संख्या घटल्यामुळे येथील बाजारपेठेतील व्यवसायिकांच्या धंदयाला 20 ते 30 टक्के कात्री लागली आहे. या बाबत कोणी आत्मपरीक्षण करीत नाही. पर्यटकांची संख्या घटण्यामागे सतत होणारी वाहतुकीची कोंडी सर्वच रस्त्यांवर टपरींनी केलेले अतिक्रमण बाजार पेठेत बसणारे परप्रातिय पथारी वाले ही कारणे प्रमुख मानली जात आहेत.
महाबळेश्वर पालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत भाग घेतला आहे. या स्पर्धेत बक्षिस मिळाविण्याचा पालिकेने चंग बांधला आहे. त्या साठी पालिकेचे लोकप्रतिनिधींसह पालिकेचे अधिकारी कर्मचारी हे स्वच्छता अभियानात गुुुंतले आहेत. या संधीचा फायदा घेवुन गेल्या दोन महीन्यात सुमारे 50 ते 60 टपरी शहराच्या विविध रस्त्यांवर लागलेल्या दिसत आहेत. दोन दिवसात आदर्जी मार्गावर बारा टपरी लागल्या असुन या रस्त्यावर आता वाहतुकीची कोंडी होणार आहे. महाबळेश्वरला एकही रस्ता असा नाही की त्या रस्त्यावर टपरी नाही. पर्यटकांची वर्दळ नाही अशा रस्त्यांवरही मोठया प्रमाणावर टपरी लागल्या आहेत. बस स्थानका पासुन ते माखरीया हायस्कुल पर्यंत सर्वत्र टपरीच टपरी दिसत आहेत. बस स्थानक, पेटीट ग्रंथालय,रे गार्डन, वाहनतळ सुभाष चौक, छ. शिवाजी चौक व स्व. बाळासाहेब ठाकरे चौक यांनाही टपरींचा विळखा पडलेला आहे. टपरींचे अतिक्रमणावर काही प्रमाणात पोलिसांचा वचक हवा परंतु पोलिस ठाण्यालाच टपरींचा विळखा पडल्याने पोलिस या टपरी पुढे कीती हतबल आहे. याची जाणीव येथे एका मंडळाने मस्जीद रोडवर तर टपरी मध्ये गणेश मुर्ती ठेवुन त्यांची पुजा सुरू केली आहे. आता लवकरच या टपरींच्या बाजुलाही टपरी लागतील. व हा रस्ताही टपरींने भरून जाईल बाजारपेठेतही चौका चौकात टपरी उभ्या आहेत. या टपरींचा आकार सहा फुट असला तरी टपरी समोरही मोठया प्रमाणावर अतिक्रमाण केल्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. सुभाष चौकात तर हातगाडयांची मक्तेदारी झाली आहे. या हातगाडयांमुळे चौकातील कारंजाही पर्यटकांना दिसत नाही. त्या मुळे चौकाच्या सुशोभिकरणावर केलेला खर्च पाण्यात गेला आहे . शहरात असलेल्या एकाही टपरीला व हातगाडीला परवाणा नाही. तरीही पालिका या सर्व हातगाडींना व टपरी धारकांना संरक्षण देत आहे. टपरी व हातगाडी वाल्यांची कमाल म्हणजे गरज नसली तरी जागा दिसेल तेथे हातगाडी किंवा टपरी लावायची व नंतर काही दिवसांनी ती भाडयाने दयायची अशा टपरी मध्ये परप्रातियांची आयतिच सोय होत असल्याने येथे मोठया प्रमाणावर परप्रातियांचे धंदे वाढले आहेत शहरात रस्त्यांवर पथारी मांडुन व शहरात फिरून धंदा करणारांमध्ये परप्रातियांचे प्रमाण मोठे आहे. या सर्वांना इनकमींग फ्रि असल्याने यांची संख्या गेली दोन वर्षात चांगलीच वाढली आहे. पालिकेचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन डोळयाला पट्ट्ी बांधुन गांधारीची भुमिका बजावत असल्याने आता जिल्हा प्रशासनाने या मध्ये गांभिर्याने लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.
महाबळेश्वर बनले टपर्यांचे नंदनवन…. संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशातील पर्यटकांचे लाडके पर्यटनस्थळ, मिनी काश्मिर आणि नंदनवन समजल्या जाणार्या महाबळेश्वरला सध्या ग्रहण लागले आहे. व्यावसायिकतेतून. मतांच्या राजकारणांचा जोगवा, आपमतलबीपणा, दंडेलशाही आणि अरेरावीतून महाबळेश्वरातील रस्त्यावर सध्या पर्यटकांपेक्षा टपर्यांची संख्या वाढताना दिसत आहे याला वेळीच आळा घातला नाही तर हे पर्यटकांचे नंदनवन न ठरता टपर्यांचे नंदनवन म्हणून ओळखावे लागेल.