फलटण : फलटण शहरात मध्यवर्ती असलेल्या सिटी प्राईडच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंगळवारी बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे.
शहरात बिबट्याचा वावर असल्याचे समजल्याने नागरिकांच्या भीतीचे वातावरण आहे. मंगळवार सकाळपासून याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. अनेकजण तो वाघ असल्याचे सांगत होते. मात्र, बुधवारी मध्यरात्रीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, बिबट्या असल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे. आज पहाटे 2.50च्या सुमारास येथील नामवैभव चिञमंदिर,सिटी प्राईड सिनिया येथील सिसीटीव्ही फुटेजमध्ये हा बिबट्या दिसुन आल्यामुळे शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन वनपाल अधिकारी घाडगे यांनी केले आहे.