मायाणी : मायणी ग्रामपंचायतीचा अधिकृत पदभार प्रथमच या पंचवार्षिक निवडणुकीत घेण्यात आलेल्या संपूर्ण गावातून थेट सरपंच पदी निवड झालेले सचिन गुदगे व मातोश्री सरूताई विकास पॅनेल चे सर्व विजयी झालेले उमेदवार उद्या मावळते सरपंच महादेव यलमर यांचे कडून पदभार स्वीकारणार आहेत. या बरोबरच उद्या उपसरपंच याचीही निवड होणार आहे .
गेल्या १६ ऑक्टोबर रोजी तारखेला पार पडलेल्या मायणी ग्रामपंचायत निवडणुकी प्रक्रियेत गेल्या पन्नास वर्ष पासून सत्तेस असलेल्या गुदगे संघटनेच्या पॅनल चा पराभव करीत माजी आमदार डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या मातोश्री सरुताई विकास पॅनेलने थेट सरपंच पदासहित दहा जागामिळवून निर्विवाद सत्ता मिळवली .परंतु गत ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ २१ ऑक्टोबर पर्यंत असल्याने सत्ता ग्रहण कार्यासाठी नूतन सरपंच सचिन गुदगे व त्यांच्या सर्व विजयी सदस्यांना उद्या पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.
नूतन सरपंच व सदस्यांचा होणारा पदभार स्विकारण्याच्या कार्यक्रमाचे डॉ येळगावकर यांच्या गटाकडून भव्य नियोजन करण्यात आले असून मायणी गावातून जंगी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सचिन गुदगे यांनी सरपंच पदाचा स्वीकार केल्या नंतर उपसरपंच पदाची बहुमताने निवड करण्यात येणार आहे . डॉ येळगावकर गटाकडे सरपंच यांचे सह १० सदस्य असे अकरा चे संख्याबळ आहे तर सुरेंद्र गुदगे गटाचे ७ सदस्य निवडून आले असल्याने उपसरपंचही येळगावकर गटाचाच होणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे . डॉ येळगावकर गटाकडून उपसरपंच पदासाठी विजय कवडे ,सुरज पाटील ,आनंदा शेवाळे यांची नावे पुढे येत आहेत