सातारा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट काम झाले आहे. झालेला पाणीसाठा मुख्य जलसिंचनाच्या माध्यमातून उपयोगात आणावा असे आवाहन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
माण तालुक्यातील पळशी येथे माणगंगा नदीतील जलपूजन जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते काल सायंकाळी करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, माजी आ. दिलीप येळगांवकर, विक्रम पावसकर, बाळासाहेब माशाळ आदि उपस्थित होते.
दुष्काळावरती कायमस्वरुपी मात करण्यासाठी विकेंद्रीत पाण्याचेसाठे निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान सुरु केले. माणगंगा नदीवरील बंधा-यांचे कम पूर्ण झाले असून सर्व बंधारे पाण्याने ओसंडून वाहत आहे. असे सांगून जलसंधारण मंत्री प्रा शिंदे पुढे म्हणाले, राज्यातला शेतकरी स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभा राहीला पाहिजे. यादृष्टीने शासन शेतक-यांच्या विकासाच्या योजना राबवित आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उत्कृष्ट काम झाले आहे. माण, खटाव सारख्या भागात जीहे कटापूर योजना कार्यान्वित करण्यासाठी मी पाठपुरवा करेन अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलयुक्त शिवारमध्ये जिल्ह्याचे उत्कृष्ट काम : जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे
RELATED ARTICLES