कराड : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याचा 6 वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. जयवंत शुगर्सचे संस्थापक आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.
याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, सौ. उत्तरा भोसले, विनायक भोसले, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, संचालक राहुल पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, कृष्णा बँकेचे संचालक महादेव पवार, चोरे गावचे माजी सरपंच दत्तात्रय साळुंखे, धावरवाडीचे सरपंच सचिन शेळके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कारखान्याचे चेअरमन चंद्रकांत देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चंद्रशीला देसाई यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की गेल्या हंगामात चांगले उत्पादन मिळाले असून, यंदाचा हंगामही यशस्वीपणे पार पडेल. हंगाम यशस्वी होण्यासाठी अधिकारी व कामगारांनी दिलेले योगदान महत्वाचे असून, कामगारांना दिवाळीपूर्वीच बोनस दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच लवकरच गाळप सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जयवंत शुगर्सचे सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, वर्क्स मॅनेजर आर. आर. इजाते, प्रॉडक्शन मॅनेजर ए. डी. वाघ, मुख्य प्रशासकीय अधिकारी ए. आर. पाटोळे, सिव्हिल इंजिनिअर शब्बीरहुसेन शेख, खरेदी अधिकारी वैभव थोरात, कामगार अधिकारी संजय भुसनर, सुरेंद्र भिंताडे, शेतकी अधिकारी एन. जे. कदम, बी. सी. कोळेकर, सौ. वैशाली मोहिते, एस. ए. माशाळकर, व्ही. वाय. चव्हाण, जालिंदर यादव यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि ऊसउत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.