कराड : भारत देश हा कुणाचीही जहागिरी नाही. हा देश नरेंद्र मोदींच्या मनमानीवर नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालेल, असा इशारा एमआयएमचे अध्यक्ष, खासदार ओवेसी यांनी दिला. आता आमच्या विकासाचे निर्णय आम्हीच घेऊ, हे 27 तारखेला नगरपालिकेच्या मतदानात दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
कराड नगरपालिका निवडणुकीतील एमआयएमच्या उमेद्वारांच्या प्रचारार्थ येथील जनता व्यासपिठवार आयोजित जाहिरसभेत ते बोलत होते. एमआयएमचे आमदार वारिस पठाण, प्रदेशाध्यक्ष सलयद मोईन, जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, नगराध्यक्षपदाच्या उमेद्वार रूपाली लादे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांची उपस्थिती होती. आपल्या जोशपूर्ण भाषणात खासदार ओवेसी यांनी काँगे्रस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगत टीकास्त्र सोडले. यावेळी हजारो मुस्लीम तरूणांची सभेस उपस्थिती होती.
देशाला स्वातंन्न्य मिळून 70 वर्षे झाली. या काळात आम्ही धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या पक्षांना साथ केली, पण आम्हाला काय मिळाले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. काँग्रेस आणि भाजपामध्ये फारसा फरक नाही. पाहिला तोंडात गोड घास भरवून गळा कापतो तर दुसरा पाठीत वार करतो. गत लोकसभेत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस आघाडीने मुस्लिमांना आरक्षण दिले, पण ते तकलादू होते. आता भाजपा व शिवसेनेचे नांव घेऊन मुस्लिमांना भीती दाखवणे बंद करा. आता मुस्लिमांनी राजकीय नेतृत्व केले नाही तर पुढील वादळांचा सामना करता येणार नाही. त्यासाठी एमआयएमला साथ करावी, असे ते म्हणाले.
मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेऊन गरिबांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे जनतेचे बुरे दिन आले आहेत. जोपर्यंत आपले लोक राजकारणात उतरणार नाहीत, तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत, असे ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांनी काल मंडईतील सभेत एमआयएम हा पक्ष भाजपची ङ्गबीफ टीम असल्याची टीका केली होती. त्याचा समाचार घेत खासदार ओवेसी यांनी चव्हाण यांना थेट चर्चेचे आव्हान दिले. आम्ही नव्हे तर काँग्रेस हीच भाजपची ङ्गबीफ टीम आहे. चव्हाण पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असताना अणू करारावेळी एमआयएमने काँग्रेसला साथ दिली होती. तेव्हा आम्ही चालतो. आज का नाही चालत, असा सवालही ओवेसी यांनी यावेळी उपस्थित केला.