सातारा : सातारा नगरपरिषदेच्या मालकीचे दुरावस्थेत असलेल्या मटण मार्केटच्या नुतनीकरण आणि दुरस्तीसाठी माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सौ.स्मिता घोडके यांनी केलेले सांघिक प्रयत्न निश्चितच, सातारच्या विकासात योगदान देणारे ठरले आहेत. गेल्या 50 वर्षापासून असलेली मटण मार्केटची दुरावस्था, दुर होण्याबरोबरच स्वच्छतेसह चांगली सुविधा सातारकरांना उपलब्ध होईल, सातारच्या शहराच्या विकासकामांसाठी सौ.स्मिता घोडके या नेहमीच हिरीरीने पुढाकार घेतात असे गौरवोद्गार सातारा लोकसभा मतदार संघाचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
नगरपरिषदेच्या मटण मार्केटचे नुतनीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष विजय बडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत भोसले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
शहरवासियांना भाजीपाला मार्केट प्रमाणेच मटण मार्केटची देखिल आवश्यकता असते हे जाणुन नगरपरिषदेने सुमारे 50 वर्षापूर्वी जुना मोटार स्टॅन्ड येथे मटण मार्केट उभारले होते. तथापि अनेक वर्षे झाल्याने, सदरचे मार्केट सध्या दुरावस्थेत होते. मार्केटमधील व्यापा-यांबराबरच नागरीकांची होणाची कुचंबणा लक्षात घेवून, नगरसेविका सौ.स्मिता घोडके यांनी विशेष प्रयत्न केल्याने आणि त्यांना सर्वांचीच साथ लाभल्याने सुमारे 25 लाख खर्च करुन, या मार्केटचे नुतनीकरण होत आहे, यापुर्वीच्या कार्यकालात देखिल सौ.स्मिता घोडके यांनी, त्यांच्या संकल्पनेतुन फिश मार्केट उभारले आहे ही निश्चितच चांगली बाब आहे.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, शहरातील दुरावस्थेतील मटण मार्केटचे नुतनीकरणाचे काम हाती घेवून, या भागातील नगरसेविका सौ.स्मिता घोडके यांनी व्यापारी व ग्राहक यांना चांगली वास्तु निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत, या सुविधेचा लाभ घेताना सातारकर नागरीकांना स्वच्छता आणि निटनिटकेपणाचा अनुभव मिळेल.
प्रथम नगरसेविका सौ.स्मिता घोडके यांनी मान्यवरांचे प्रभागाच्या वतीने स्वागत केले. मटण मार्केटमधील गाळेधारकांनी आभार मानले. यावेळी आरोग्य सभापती रविंद्र झुटींग, नगरसेवक जयेंद्रदादा चव्हाण,अविनाश कदम, माजी नगराध्यक्ष नासिर शेख, जनता बॅन्केचे संचालक चंद्रशेखर घोडके, माजी नगरसेवक अल्लाउद्यीन शेख, श्रीकांत आंबेकर, मुक्तार पालकर, राम हादगे, पालकर, निकोडे, खाटीक, कुरेशी, शेख, दिपक शेलार, आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मटण मार्केटचे नुतनीकरण , सौ.स्मिता घोडके यांनी फिश मार्केटप्रमाणेच संकल्पनेप्रमाणेच केल्याने, या भागातील नागरीकांना होणारा दुर्घंधीचा त्रास जवळजवळ संपणार असल्याने, परिसरातील नागरीकांनी सौ.घोडके यांना धन्यवाद दिले आहे.