फलटण : फलटण नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या ऊमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचे तीन तर नगसेवकपदाच्या 31 ऊमेदवारांनी आपली ऊमेदवारी मागे घेतली. नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत होणार असून नगरसेवक पदाच्या 25 जागांसाठी 90 ऊमेदवार निवडणूक रिंगणात ऊभे आहेत. दरम्यान फलटण मधून राष्ट्रवादीने विजयी सलामी दिली असून प्रभाग क्रमांक 1 मधून विक्रम सोमाशेठ जाधव हे बिनविरोध निवडूण आले आहेत.
फलटण नगरपरिषदेच्या नगरसेवक पदासाठी निवडणूक रींगणात राष्ट्रवादी चे 24, काँग्रेसचे 24, भाजपाचे 23, शिवसेनेचे 4 तर अपक्ष 15 असे एकुण 90 ऊमेदवार तर नगराध्यक्ष पदासाठी 5 ऊमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अखेरच्या दिवशी ऊमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या ऊमेदवारांची प्रभागनिहाय नावे पुढिल प्रमाणे प्रभाग क्रमांक 1 ब सर्वसाधारण – साळुंखे शरद पांडुरंग, प्रभाग क्रमांक 2 अ अनुसुचित जा, महिला – गंधारी समुद्रलाल अहिवळे, ज्योती राजेंद्र काकडे, पुष्पा विनायक अहिवळे, विद्या अजित आहिवळे, रेणुका पांडुरंग आहिवळे. प्रभाग क्रमांक 2 ब सर्वसाधारण – निखील नदकुमार पवार, पांडू समुद्रलाल अहिवळे, लखन नंदकुमार मोरे, प्रभाग क्रमांक 3 अ अनुसुचित जाती – सोनबा हणमंत इंगळे, लखन नंदकुमार मोरे. प्रभाग क्रमांक 4 ब सर्वसाधारण – अमित सुरेश पवार. प्रभाग क्रमांक 6 अ सर्वसाधारण महिला – वैशाली मितेश खराडे. प्रभाग क्रमांक 7 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग – हेमंत दत्तात्र ननवरे, सचिन चंद्रकांत गानबोटे, विजय संभाजी गाडे. प्रभाग क्रमांक 7 ब सर्वसाधारण महिला – गौरी प्रदिप पवार. प्रभाग क्रमांक 8 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – जयश्री रणजीत भुजबळ. प्रभाग क्रमांक 8 ब सर्वसाधारण – पुनम सम्राट गायकप्रवर्ग, आयामत गनीम शेख. प्रभाग क्रमांक 9 ब सर्वसाधारण – दीपक हणमंत चोरमले. प्रभाग क्रमांक 10 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग – निलेश विनायक चिंचकर, फिरोज शहानवाज आतार, सुरेश माधवराव पवार. प्रभाग क्रमांक 10 ब सर्वसाधारण महिला – अमिना इक्बाल शेख. प्रभाग क्रमांक 11 अ अनुसुचित जाती – प्रविण तुळशीराम आगवणे, विजयकुमार दिनकर पाटोळे, प्रितम चंद्रकांत बेंद्रे. प्रभाग क्रमांक 12 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग – अमित रामचंद्र शिंदे. प्रभाग क्रमांक 12 क सर्वसाधारण महिला – रुपाली अमोल सस्ते, पुनम सम्राट गायकवाड.
नगराध्यक्ष पदाचे ऊमेदवारी अर्ज माघारी घेतलेले ऊमेदवार
रुक्मिणी तानाजी करळे, नाजीया अयमत शेख. दरम्यान ऊमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आखेरच्या दिवशी सर्व पक्षीयांसमोर अपक्ष ऊमेदवारांनी आव्हान ऊभे केले असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून अपक्षांची ऊमेदवारी कोणाला भोवणार याची जोरदार चर्चा होत आहे.