भिलार : पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपद आणि एकूण 17 जागांसाठी आज शांततेत मतदान पार पडले. नगराध्यक्षपदाच्या नऊ आणि नगरसवेकपदाच्या 78 उमेदवारांचे भवितव्य आज मशीनबंद झाले. किरकोळ प्रकार वगळता पाचगणीत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी संथपणे मतदान सुरू झाले. दुपारपर्यंत मतदारांचा उत्साह जाणवला नाही परंतु सायंकाळी मात्र मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. आज पाचगणीत एकूण 78.62 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आरती भोसले यांनी दिली.
पाचगणीतील आठ प्रभागात एकूण 14 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. आज झालेल्या मतदानात 4311 पुरूष आणि 4483 महिला असे मिळुन एकूण 8794 मतदानापैकी 3443 पुरूष आणि 3471 महिला यांनी मिळून एकूण 6914 एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शासकीय तांत्रिक विद्यालय हे 136 अशा सर्वात लहान मतदार संख्येचे केंद्र होते. तर सर्वात न्यु ईरा स्कूलमधील 842 मतदार संख्येचे केंद्र होते