साताराः येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग गीतापरिवार रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प आणि इनरव्हील क्लब ऑफ सातारा कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रज्ञासंवर्धन योगप्रशिक्षण कार्यशाळेला आज प्रारंभ झाला. या कार्यशाळेत सातारा तालुका व सातारा शहर परिसरातील 100 हून अधिक योग साधक व योग शिक्षक सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणार्या या कार्यशाळेचे उदघाटन देशाच्या संरक्षण मंत्रालयातील अॅडव्हेंचर स्पोर्ट इंडियन नेव्हीचे जॉइंट डायरेक्टर कमांडर संजय कुलकर्णी यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जे.के.देवी अॅन्ड सन्स या फर्मचे मालक जगन्नाथशेठ देवी उपस्थित होते. याप्रसंगी गीतापरिवाराच्या सौ. कांता देवी, इनरव्हील क्लबच्या सौ. गीता मामणीया, रोटरी क्लब सातारचे सेक्रेटरी अमित कदम व सर्व कल्याण योग गीतापरिवारच्या राष्ट्रीय समन्वयक सौ. संगीता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेत योगाचार्य सुरेश जाधव सरांची एकूण 6 सत्रे आयोजित करण्यात आली असून यामध्ये कपालभातीचे पाच तत्वीय प्रकार तसेच मुख्य दोन प्रकार अशा सात विभागांची प्रॅक्टीकल्स घेण्यात येत आहेत. त्राटक, लघुध्यान, प्रकाशधारणा आणि शरीरातील पाच ज्ञानेंद्रिये यांच्या क्षमता विकासासाठी योगीक व्यायाम याचे प्रात्यक्षिके करून घेतली जात आहेत. प्रज्ञासंवर्धन नामक अभ्यासक्रमातून मेंदूच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही भागांची सर्व केंद्रे जागृत केली जातात. ज्यामधून लघुध्यान प्रक्रियेतून स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, ग्रहणशक्ती व आकलनशक्तीचा विकास साधला जातो. आवश्यक असे हे योगिक प्रकार विशेषकरून आठ ते सोळा वयोगटासाठी तयार करण्यात आले असून हा अभ्यासक्रम संबंधित शिक्षकांच्यावतीने सर्व शाळांत सुरू व्हावा हीच या कार्यशाळेमागची प्रेरणा असल्याचे सुरेश जाधव यांनी यावेळी सांगितले.योगाभ्यासामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम हा सातार्यात जरी प्रथम होत असला तरी राज्यातील बारा जिल्हयात यापुर्वी अडीच हजार शिक्षकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
उदघाटन सोहळयास उपस्थित असलेल्या कमांडर संजय कुलकर्णी यांनी या योगिक अभ्यासाची गरज सर्वानाच असून हा उपक्रम सर्वत्र यशस्वी राबविला जावा अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. गीता मामणीया, सौ. कांता देवी, सौ. संगीता जाधव यंानी केले.
प्रज्ञा संवर्धन योगप्रशिक्षण कार्यशाळेस सातार्यात प्रारंभ
RELATED ARTICLES