सातारा : शिवाजी विद्यापिठाच्या वतीने घेण्यात आलेल्या फार्मसी विभागांच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील एम. फार्मसीची विद्यार्थीनी प्रियांका सणस हिने 75 टक्के गुण मिळवून शिवाजी विद्यापिठात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, संचालक प्रा. डॉ. आर. जे. डायस, सहसंचालक प्रा. बी. बी. जैन यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यशोदा टेक्निकल कॅम्पसने फार्मसी विभागातील आपला दबदबा कायम राखला आहे. सतत अग्रेसर असलेल्या यशोदा टेक्निकल कॅम्पसची विद्यार्थीनी प्रियांका सणस ही विद्यापीठात पहिली आली आहे. त्यामुळे विद्यापीठ स्तरावरही सातार्याचे नाव अभिमानाने घेतले जाऊ लागले आहे. प्रियांका सणस हिने 75 टक्के गुण मिळविले तर किर्ती गोडसे हिने 66 टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळविला. करिष्मा बैध आणि प्राजक्ता दावंडे यांनी प्रत्येकी 65.5 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
एम. फार्मसी विभागात फार्माकोलॉजी आणि फार्मासुटीक्स असे दोन विभाग आहेत. फार्मासुटीक्समध्ये राजश्री बडदरे हिने 70 टक्के, पंकज कवितके याने 68 टक्के तर निखील ढाणे याने 67 टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
यशोदामध्ये उच्च निकालाची परंपरा कायम राखण्यासाठी वर्षभरात विविध कार्यक्रम राबविले जातात. औषध निर्मिती कंपनीतील तज्ञांचे मार्गदर्शन व व्याख्याने, महाविद्यालयातील अनुभवी व विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देणारे शिक्षक या सुविधांमुळे यशोदामध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. तज्ञ उच्चशिक्षित व दीर्घ अनुभवी प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यशोदाचे संचालक प्रा. डॉ. आर. जे. डायस यांना 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी 30 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध, 4 पुस्तके व 1 पेटंट घेतले आहे. तर सहसंचालक प्रा. डॉ. बी. बी. जैन यांना 22 वर्षांहून अधिक शैक्षणिक व 2 वर्षे औद्योगिक क्षेत्रातील अनुभव असून त्यांनी 51 शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित केले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. कैलास माळी, प्रा. विजय हवालदार, प्रा. विश्वजीत घोरपडे यांनी मार्गदर्शन केले.
दर्जेदार सुविधांमुळे यश मिळविणे शक्य : सणस
यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये अत्यंत उच्च दर्जाच्या सुविधा आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली सर्व साधानसा मुग्री आणि पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे यश मिळविणे अधिक सोपे झाले. प्रशस्त लॅब, वातानुकुलित ग्रंथालय, वाय फाय कॅम्पस, संगणक कक्ष, अत्याधुनिक उपकरणे, बस सुविधा, कॅन्टीन, विद्यार्थीनींसाठी हॉस्टेलची सुविधा याचे शैक्षणिक यश मिळविण्यात मोठे योगदान असल्याचे विद्यापिठात प्रथम आलेल्या प्रियांका सणस हिने सांगितले.
एम. फार्मसीमध्ये यशोदाची प्रियांका सणस विद्यापीठात प्रथम
RELATED ARTICLES